मारवाडी स्मशानभूमीचा तिढा सुटेना! जागेअभावी हेळसांड; मारवाडी समाज आक्रमक 

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

उदगीर  : येथील मारवाडी स्मशानभूमीचा तिढा काही केल्या सुटत नसल्याने आता मारवाडी समाजात कोणी मयत झाले तर त्याचे अंतिम संस्कार तहसिल कार्यालयासमोर करण्यात येईल त्यास प्रशासन जबाबदार राहील असे उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यानी सांगीतले आहे.

                    उदगीर येथिल मारवाड़ी समाजास स्मशानभूमिसाठी जागा मिळावी म्हणून मागील तीन वर्षा पासून ना.संजय बनसोडे यांच्याकडे मागणी केली होती ती मागणी ग्राह्य धरून तोंडार पाटी येथे ५ गुंठे जागा देण्यात आली खरी पण त्या जागेवर अनेकांनी घरकुल उभे केले असल्याने तेथे मोजणी दिवशीच वाद झाल्याने समाजाने अन्य ठिकाणी जागा देण्याची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी जागा दाखवा मी जागा देतो म्हणून पूर्ण सहकार्य केले ,नगरपालिकेने जागा मोजणी साठीची फी ५७ हजार रुपये भूमी अभिलेख विभागाकडे भरले पण भूमी अभिलेख कडून प्रत्येक वेळेस नवनवीन कारणे देत आहेत,जो पर्यंत जागा मिळत नाही तो पर्यंत ना बनसोडे यांनी स्मशानभूमी विकासाठी ५० लक्ष रु निधीचे पत्र नियोजन विभागा मार्फत नगर पालिकेस दिले पण जागेचाच प्रश्न मिटत नसल्याने पुढील बाबी काही साध्य होत नसल्याने कंटाळून आता जर पुढे मारवाडी समाजात कोणाचा मृत्यू झाला तर त्याचे अंतिम संस्कार तहसील समोर करणार असल्याचे समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांनी सांगितले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!