त्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू आकस्मिक ; झालेल्या घटनेने जेएसपीएम परिवार शोकाकूल – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे स्पष्टीकरण 

2 Min Read

लातूर : जेएसपीएम शिक्षण संस्था लातूरद्वारा संचालित स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल, लातूर येथे इयत्ता 7 वी मध्ये शिकणार्‍या अरविंद राजाभाऊ खोपे (रा.पांगरी ता.परळी) याचा आकस्मिक मृत्यू झाला. या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे अचानक निदर्शनास आले. पोस्टमार्टेमच्या प्राथमिक अहवालानुसार या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्‍न झाले. या आकस्मिक झालेल्या घटनेने जेएसपीएम परिवार शोकाकूल आहे. मी व अजितसिंह पाटील पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे मुंबई रेल्वे प्रवासात असताना रात्री 11 वा. दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. त्याच क्षणाला एमआयडीसी पोलीस विभागाला या घटनेच्या संदर्भावरून मी स्वतः फोन करून माहिती दिली व त्यानंतर तपासाची पुढील कार्यवाही सुरू झाली असे स्पष्टीकरण माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी जेएसपीएम शिक्षण संस्थेत झालेल्या घटनेवर दिले आहे. पुढे ते म्हणाले की, मुंबई येथून त्याच दिवशी लातूरला परत येऊन या संदर्भातील सविस्तर माहिती घेतली. अरविंद खोपे या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये जाऊन आत्महत्या केल्याची नोंद सीसीटीव्ही कॅमेरामध्ये असताना व प्राथमिक पोस्टमार्टम मेडीकल रिपोर्टमध्ये आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे असे असताना राजकीय आकसापोटी काही संघटना, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व काही न्यूज पोर्टलवाल्यांनी चुकीची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून देऊन संस्थेला व आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करू परंतु सत्य हे सत्यच असते. त्यामुळे सदरील मुलाने आत्महत्याच केल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलेले आहे. यातून राजकीय द्वेषापोटी बदनामी करणार्‍यांचे पितळ पूर्णपणे उघडे पडलेले आहे. संस्था हे जाहिरपणे नमूद करू इच्छिते की, या घटनेमध्ये पोलीस तपासानंतर व्यवस्थापनामधील दोन कर्मचारी चौकशीसाठी पोलीसांच्या ताब्यात दिलेले आहेत, ते दोषी आढळल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही पोलीस करीतील. लातूर हे ‘शैक्षणिक हब’ म्हणून ओळखले जाते. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून संस्था सर्व परिने प्रयत्नशील राहील असा विश्‍वास व स्पष्टीकरण संस्थेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व सर्व कार्यकारी मंडळाने व्यक्‍त केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!