Latur Police | पोलीस शिपाई बॅण्डस्मन भरतीसाठी शुक्रवारी लेखी परीक्षा 

2 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

लातूर : जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई बॅण्डस्मन पदासाठी लातूर जिल्हा पोलीस शिपाई बॅण्डस्मन भरती सन २०२२-२०२३ मध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा शुक्रवार (दि.२) रोजी सकाळी ०९.०० वा. पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यासाठी उमेदवारांनी शुक्रवार (दि.२) रोजी सकाळी ०६.०० वा. पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर या ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांनी स्वतःचे प्रवेशपत्र (Hall Ticket) व स्वतःच्या ओळखीसाठी फोटो असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेंस सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले. लेखी परीक्षा ही पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, तसेच उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल, इलेट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रामध्ये घेऊन येऊ नये किंवा सोबत बाळगण्यात येऊ नये. लेखी परीक्षा ही सी.सी.टि.व्हि. व व्हिडीओ ग्रॉफी च्या निघराणीखाली अतिशय तटस्थपणे, निःपक्षपातीपणे व पारदर्शकरित्या घेण्यात येत असून, उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल, इलेट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रामध्ये घेऊन येऊ नये किंवा सोबत बाळगण्यात येऊ नये. उमेदवारांने कोणत्याही आमिषास व भूलथापांना बळी पडू नये, कोणाकडून असे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास सदरची बाब पोलीस अधीक्षक, लातूर, अपर पोलीस अधीक्षक, लातूर, पोलीस उप अधीक्षक (मुख्या.), लातूर व पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांना तात्काळ कळविण्यात यावे असे लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

आक्षेप येथे नोंदवता येणार 

अपर पोलीस अधीक्षक, लातूर (मोबाईल क्रमांक ९९२३१३२८२७), नियंत्रण कक्ष, लातूर (दुरध्वनी क्रमांक ०२३८२-२४२२९६), पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. लातूर दुरध्वनी क्रमांक ०२३८२-२४२६७४) तसेच ई-मेल आयडी sp.latur@mahapolice.gov.in वर सविस्तर आक्षेप नोंदविण्यात येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!