२०१३ च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील ६१० अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी बढती

2 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर / साईनाथ घोणे : राज्यातील पोलीस उपनिरीक्षक PSI पदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अर्हता परीक्षा २०१३ मधील पात्र असलेल्या ६१० पोलीस अंमलदारांना सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षकपदी PSI बढती देण्यात आली आहे. यात लातूर जिल्हा पोलीस दलातील १० पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीचा समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी याबाबतचे आदेश काढला आहे.
कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेल्या कर्मचाऱ्याची आपण किमान पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून निवृत्त व्हावे, अशी अपेक्षा असते. पदोन्नीतीने भरल्या जाणाऱ्या उपननिरीक्षकपदांचा वेग अत्यंत कमी आहे. साहजिकच यात हजारो कर्मचाऱ्यांचे अधिकारीपदाचे स्वप्न हे स्वप्नच राहते. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस हवालदार परीक्षा उत्तीर्ण होऊनही पदोन्नतीपासून वंचित राहिले होते. त्यातील अनेक जण वयोमानानुसार सेवानिवृत्त देखील झाले आहेत. आज पदोन्नती मिळालेल्या सर्व अंमलदारांनी त्यांची वयाची ५० वर्षे ओलांडलेली आहे. त्यातील ९० टक्के अंमलदार हे नजीकच्या २ ते ५ वर्षांच्या कालावधीत वयोमानाने सेवानिवृत्त होणार आहे.  लातूर जिल्ह्यातील पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आणि पुढील कंसात पोलीस उप निरीक्षक म्हणून झालेले नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे : भागवत वामनराव मुळे (पुणे शहर), शिवानंद बाबुराव मुरुडकर (नांदेड परिक्षेत्र), स्वरूप नरसिंगराव धुमाळ (नांदेड परिक्षेत्र), बालासाहेब नागोराव मस्के (नांदेड परिक्षेत्र), अरुण मारुती तलवार (नांदेड परिक्षेत्र), मकबूल महेबुब शेख (नांदेड परिक्षेत्र), मुक्तार इब्राहिम शेख (नांदेड परिक्षेत्र), भिम लक्ष्मण देवकर (नांदेड परिक्षेत्र), आदिनाथ दत्तात्रय शिरसाठ (नांदेड परिक्षेत्र), रामचंद्र पुंडलिक गोखरे (नांदेड परिक्षेत्र).

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!