Udgir Firing News Update | या कारणामुळे जकनूर येथे गोळीबार

2 Min Read

मुखपत्र दक्षता वृत्तांत 

उदगीर : तालुक्यातील जकनूर पाटी जवळील एका वेअर हाऊस ऑफिसच्या समोर बुधवारी (दि.३१) सायंकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखत उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान याप्रकरणी एका गटाने पिस्तुलने गोळीबार केल्याची तक्रार केली असून दुसऱ्या गटाकडून दारू पिण्यासाठी पैसे द्या म्हणुन खंडणी मागितल्याची तक्रार दिल्याने परस्परा विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१) रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उदगीर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी अनिल चिद्रेवार (३७) रा.आनंदनगर, डॅम रोड उदगीर याला आरोपी लाला उर्फ अकबर पठाण, फिरोज व इतर दोन अशा चौघानी बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जकनाळ पाटी येथे लक्ष्मी वेअर हाऊस मध्ये येऊन समोर तू फार माजला आहेस, मला दारू पिण्यासाठी पैसे दिला तर बरं आहे नाही तर तुला खतम करतो तसेच तुझ्या बापाला सुद्धा खतम करतो अशी धमकी देऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खंडणी मागितलेची तक्रार दिल्यावरून वरील आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे भारतीय न्यायीक संहीता २०२३ कलम ३०८(२), ३५१(२),(३), ११५(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अकबर शेरदिलखाँन पठाण वय ३०, रा. अलीनगर, डॅमरोड समतानगर उदगीर यानी दिलेल्या तक्रारीवरून बालाजी चिद्रेवार, अनिल चिद्रेवार व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी संगणमत करून बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी वेअर हाऊसच्या समोर ट्रक थांबलेले आहेत तू विचारणार कोण ? याचा राग मनात धरून फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली व अनिल चिद्रेवार यानी त्यांच्याकडे असलेल्या पिस्तूलने फिर्यादीस कानाजवळ गोळी मारून गंभीर जखमी केल्याची तक्रार दिल्यावरून भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ११८(१),११८(२),३५२,३५१(२) (३) नुसार गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम हे करीत आहेत. या प्रकरणातील कांही आरोपींना पकडण्यात यश आले आहे तर पिस्तूल धारक व्यक्तीचा शोध सुरु आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!