शेत शिवारातील जुगार अड्डयावर लातूर ग्रामीण पोलिसांचा छापा ; साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त 

2 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

लातूर / साईनाथ घोणे : तालुक्यातील धनेगाव येथे शेतामध्ये एक पत्र्याच्या शेड तयार करून त्यामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (दि. २) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले तर एकजण फरार आहे. पोलिसांनी रोकड, वाहने, जुगाराचे साहित्य ७ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लातूर तालुक्यातील धनेगाव येथील एका शेतात एक पत्र्याचे शेड बनवून त्यामध्ये पैशांवर तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती लातूर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे, पोलीस अंमलदार विनोद लखनगिरे, सचिन चंद्रपाटले, राहुल दरोडे, बालाजी यादव, संतोष थोरात, नितीन पाटील, कुंडलिक खंडागळे, दाजीबा यादव, आंबेकर यांनी धनेगाव येथील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

यावेळी १. आकाश धोंडीराम डुमणे रा.आनंद नगर लातूर, २. रंजीत अशोकराव देशमुख रा.कनेरी ता.जि.लातूर, ३.रोहित अशोक चिकटे रा. बौद्ध नगर लातूर, ४. बिलाल इजाज मिया शेख रा.कनेरी चौक लातूर, ५.ओमकार हणमंतराव तांबोळकर रा. लातूर, ६. इमरान रजाक शेख रा. न्यू काझीमोरहला लातूर, ७. संजय काकासाहेब भोसले रा.आनंद नगर लातूर, ८. ऋषिकेश राजकुमार कांबळे रा. भोई गल्ली लातूर, ९. ओमकार नरहरी कांबळे रा.भोई गल्ली लातूर, १०. प्रदीप हिरामण बानाटे रा.आनंद नगर लातूर, ११. अवधूत मल्लिकार्जुन गुंडरे रा. देवणी, १२. सादिक सत्तार शेख रा.माताजी नगर लातूर ह.मु.पाचपीर दर्ग्या जवळ आरटीओ ऑफिस लातूर यांना जुगार खेळताना पकडण्यात आले तर रवी डोनगहु रा. राजीव नगर लातूरहा फरार आहे. यावेळी रोकड, वाहने, जुगाराचे साहित्य असा ७ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे यांच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!