संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी आरक्षणाबाबत कव्हेकरांची चर्चा

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर: मराठा आरक्षणाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटी येथील निवासस्थानी भाजपा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मागणीला पाठींबा असल्याचे सांगून त्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!