‘आनंदोत्सव’:गौरव गुणवंतांचा, सोहळा कौतुकाचा! नीट -२०२४ मधील गुणवंत आयआयबीएन्सचा गौरव सोहळा थाटात संपन्न 

2 Min Read

 

मुखपत्र दक्षता वृतांत 
लातूर: नुकत्याच जाहीर झालेल्या नीट -२०२४ परीक्षेच्या निकालात उत्तुंग यशाची झेप घेत नीट मध्ये उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या आयआयबी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा आज दि. १० ऑगस्ट रोजी भव्यदिव्य ऐतिहासिक गौरव सोहळ्यात सत्कार करण्यात आला. मागील तब्बल २५ वर्षापासून डॉक्टर आणि इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी आणि महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून नावलौकिक असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटने नीट -२०२४ मध्येही दमदार निकाल दिला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून आपल्या डॉक्टर होण्याकडे एक पाऊल पुढे टाकलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार व्हावा यासाठी आयआयबी इन्स्टिट्यूटच्या वतीने निकाल लागून दोन महिने उलटल्या नंतरही आयआयबी ने हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले ते फक्त वचनपूर्ती साठी व सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना यशस्वी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा फायदा पोहचावा म्हणून गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घेतलेले अभ्यासरुपी परिश्रमाचा तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम हे आगामी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरावे हा या गौरव सोहळा आयोजना मागचा उद्देश होता. शेकडो गुणवंत त्यांचे पालक, हजारो विद्यार्थी व आयआयबी इन्स्टिट्यूटचे सीईओ प्रा.दशरथ पाटील,सर्व संचालक मंडळ, आयआयबी लातूरचे संचालक प्रा.चिराग सेनमा, आयआयबी लातूरचे सर्व तज्ञ गुरुजन व मॅनेजमेंट टीम यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात व आयआयबीची प्रार्थना म्हणून उत्सवमूर्ती गुणवंतांचा गौरव समारंभाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात नीट २०२४ परीक्षेत आयआयबी क्लासेसचा टॉपर सिद्धांत राख व इतर यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना यशाचे रहस्य सांगितले. कठोर मेहनत , आयआयबीच्या टेस्ट सिरीज, प्रा.चिराग सरांनी केलेले मायक्रो प्लॅनिंग व आयआयबीचा सर्वोत्तम शैक्षणिक पॅटर्न प्रत्येकाला यश मिळवून देऊ शकतो हा विश्वास ही दिला.
प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला लाखोंच्या बक्षीसासोबत दिलेली कौतुकाची थाप म्हणजे, प्रत्येक वर्षी आयआयबीने दिलेल्या वचनाची वचनपूर्तीच.
यावेळी अतिशय दिमाखदार सोहळ्यात उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाचे कौतुक केले, व सध्या नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी असेच सर्वोच्च यश मिळवण्याच्या निश्चयाने कार्यक्रम स्थळ सोडले. शेवटी हजारो विद्यार्थी पालक गुरुजन सर्व मंडळींनी राष्ट्रगीत म्हणून झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!