पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेल्या अनिशा आगरकर यांचे आ. कराड यांच्याकडून अभिनंदन

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

लातूर / प्रतिनिधि – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मौजे डिगोळ देशमुख येथील कु. अनिशा दयानंद आगरकर ही मुलींमधून राज्यात सर्वप्रथम आली. या यशाबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून तिचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

             लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील रेणापूर तालुक्यातील मौजे डिगोळ देशमुख येथील शेतकरी दयानंद आगरकर यांची कन्या अनिशा आगरकर हीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त सेवा परीक्षा दिली होती. पूर्वपरीक्षा, परीक्षा व मुलाखत या तिन्ही टप्यांवर ती यशस्वी झाली असून १ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालात अनिशा आगरकर ही मुलींमधून राज्यात सर्वप्रथम आली. तिच्या या घवघवीत यशाबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी श्री पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार केला व अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनिशा आगरकर हिने मेहनतीतून आणि कष्टातून मिळविलेले यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!