पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर

1 Min Read
IPS Officer Transfers

मुखपत्र दक्षता वृतांत 

लातूर : राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ११४८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासनाने १२ ऑगस्ट रोजी ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर केले आहे. त्यात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय विनायक मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय माधवराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन व्यंकटराव तोटेवाड तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथील पोलीस हवालदार दत्ता हावाप्पा मडोळे, पोलीस शिपाई अभिमन्यू अशोक गाडवे या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये भारतीय पोलीस सेवा (भापोसे) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदक जाहीर झालेले हे पोलीस अधिकारी सध्या लातूर जिल्ह्यात सेवा बजावत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!