लातूर : घरमालकाचे व आमच्या भांडणात तु का पडलास म्हणून फिर्यादी मनोहर प्रकाश लोंढे (रा.शालिमार फंक्शन हॉल समोर, लातूर) यांना आरोपी महादू व अन्य दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, कत्तीने मारहाण करून जखमी करत, तु आमच्या नादी लागलास तर तुला खल्लास करतो अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार फिर्यादी लोंढे यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर काळगे हे अधिक तपास करत आहेत.