काजळी चिंचोली येथून म्हैस चोरीस 

0 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

औसा : तालुक्यातील काजळी चिंचोली येथे शेतकरी भरत दशरथ सोनटक्के यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यातील एक म्हैस शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. शेतातील गोठ्यातून म्हैस चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली.

या घटनेनंतर परिसरात जनावरांचे गोठे असलेल्या शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान भादा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. पुढील अधिक तपास पोलीस अंमलदार अनंत शिंदे करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!