बसमधुन तरुणाची लॅपटॉपची बॅग लांबवली

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

अहमदपूर : नांदेड ते लातूर असा प्रवास करताना अहमदपूर बसस्थानक येथे फिर्यादी उतरले असता एसटी बसमध्ये असलेली बॅग ज्यात लॅपटॉप, लॅपटॉप चार्जर, मोबाईल चार्जर, कपडे, गाड्याची चावी व ऑफिसची चावी असा मुद्देमाल अज्ञात चोरानी चोरुन नेला. ही घटना गुरुवार (दि.१५) रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी फिर्यादी सैफअली अब्दुल रज्जाक कुरेशी, वय २९ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी कॅपॅसीटी LLC, वाकड पुणे रा. कुरेशी मोहल्ला लातूर यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!