उदगीरात घरासमोरून कार लंपास! पोलिसांत गुन्हा दाखल; चोरट्यांची हिंमत वाढली

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

उदगीर : येथील नांदेड रोड वरील जयप्रकाश नगरमध्ये घरासमोरून चोरट्यांनी अर्टिगा कार लंपास केल्याची घटना घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिसांत गुरुवारी (दि.१५) गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे. उदगीर येथील नांदेड रोडवरील जयप्रकाशनगरमध्ये राहणारे अनुप वसंत मोरे यांचे अर्टिगा कार (एमएच २४, एएफ २४४९) घराच्या समोर उभी केली होती. बुधवारी सकाळी झोपेतून उठून पाहिले असता कार घरासमोर नव्हती. त्यांनी वाहनाचा परिसरात शोध घेतला मात्र कुठेच आढळून आले नाही. चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाहनाचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर गुरुवारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणी वाहन शोधण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. मागील काही दिवसांमध्ये उदगीर शहरासह परिसरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पूर्वी मोटारसायकल चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या आता तर चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क चारचाकी वाहनांकडे वळवून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. मात्र गेल्या काही वाहनचोऱ्यांबाबत कोणताही ठोस तपास झाला नसल्याने चोरट्यांची हिंमत वाढली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!