विलास सहकारी साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर: तालुक्यातील वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२४-२५ च्या गळीत हंगाम रोलरचे पूजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवार (दि.१६) रोजी करण्यात आले़. विलास सहकारी साखर कारखान्याने स्थापनेपासून आजपर्यंत सर्वच गळीत हंगाम यशस्वतीपणे पार पाडले आहेत़. आगामी गळीत हंगामाची तयारी सुरु करण्यात आली आहे़. शुक्रवारी कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते रोलर पुजन झाले़. या कार्यक्रमास कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन, संचालक, कार्यकारी संचालक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!