लातूर : शहरातील खोरी गल्ली परिसरात फिर्यादी विनोद शंकरराव पाटील (रा. दवणहिप्परगा ता. देवणी हमु. उमाकांत खानापुरे यांच्या घरी खोरी गल्ली लातूर) यांचे ‘आपले सरकार’ दुकान असून ते दुकान खाली करण्याच्या कारणावरून गणेश दुरुगकर रा. खोरी गल्ली लातूर यांनी मंगळवार (दि.६) रोजी साडे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास दुकानाचा दरवाजा तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील डेल कपंनीचे संगणक, इन्वर्टर, बॅटरी असे जमिनीवर आदळून फोडून फिर्यादीचे ९० ते ९५ हजार रुपयांचे नुकसान केल्याबाबत फिर्यादी विनोद शंकरराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (दि.१६) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास पोह ९८५ मुळे करत आहेत.