रक्षाबंधन विशेष: मागील दीड वर्षात भरोसा सेलने साडे पाचशे पेक्षा जास्त महिलांचे संसार आणले रुळावर; ‘भरोसा सेल’ कुठे आहे व येथे तक्रार कशी नोंदवावी?

1 Min Read

‘भरोसा सेल’ कुठे आहे व येथे तक्रार कशी नोंदवावी?

पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात भरोसा सेलचे कार्यालय असून येथे सोमवार ते शनिवार सकाळी १० ते ६ यावेळेत तक्रार नोंदवता येते.

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर : गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने विविध उपाय केले जातात. यासोबतच गुन्हे घडूच नये यासाठी ही विविध उपाय योजिले जातात. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरूद्ध लढण्यासाठी त्यांना शारिरीक आणि मानसिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत तत्कालीन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतून भरोसा सेलची स्थापना करण्यात आली होती. हा ‘भरोसा सेल’ जिल्ह्यासाठी विश्वासपात्र ठरला असून या भरोसा सेलच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलाला मागील दीड वर्षात ५५० पेक्षा अधिक महिलांचे संसार रुळावर आणण्यात यश आले आहे.

राज्य शासन महिलांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवत आहे तर दुसरीकडे पोलीस विभाग ही महिलांना शारीरिक व मानसिक बळ देतांना दिसत आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

सदर भरोसा सेल हा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी सपोनि दयानंद पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ सूर्यवंशी, पोलीस अंमलदार उत्तम जाधव, महिला पोलीस अंमलदार हेंगणे, मुळे, घनगावे, मोहिते, सोळूंके, चिखलीकर, हिंगे यांच्या पथकामार्फत कार्यरत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!