लातूर : राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गृहमंत्रालयाने गुरुवारी या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त निसार तांबोळी यांची सहआयुक्त, नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय आयपीएस अधिकारी शारदा राऊत यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ) या पदावर बदली करण्यात आली आहे. तर भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई) या पदी बदली करण्यात आली.
आयपीएस अधिकारी नूरुल हसन यांची पोलीस अधीक्षक (भंडारा) या पदावर बदली करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी निलेश तांबे यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (नागपूर) या पदावर बदली करण्यात आली आहे.