विलास सहकारी साखर कारखाना युनिट – २ ला “बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड”

3 Min Read
(छायाचित्र - संग्रहीत)
(छायाचित्र – संग्रहीत)

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर / प्रतिनिधी : येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना परिवारातील विलास सहकारी साखर कारखाना युनिट – २, तोंडार, उदगीर येथील कारखान्यास द डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (डीएसटीए) इंडियाने २०२४ वर्षातील प्रतिष्ठित “बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार डीएसटीएच्या वार्षिक अधिवेशनादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे. या पारितोषीकामूळे सहकार आणि साखर कारखानदारीत विलास साखर कारखान्याच्या माध्यमातून मांजरा परीवारातील साखर उदयोगाचा दबदबा निर्माण झाला आहे. द डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (डीएसटीए), पुणे सन १९३६ मध्ये स्थापन झालेली ही साखर उद्योगातील एक अग्रणी संस्था आहे. सुमारे २२०० हून अधिक सदस्यांसह, डीएसटीएची या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. “बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड” सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा साखर उद्योगातील उत्कृष्ट योगदानासाठी दिले जाणारे मानाचे पारीतोषीक दिले आहे. विलास सहकारी साखर कारखाना युनिट – २ ची यासाठी निवड झाली आहे. गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्ये साखर कारखान्यानी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करूनच विलास सहकारी साखर कारखानाची या पारीतोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.सदरील पारीतोषीक शनिवार दि. २४ ऑगष्ट २४ रोजी पुणे येथील सभागृह, जे.डब्ल्यू. मॅरियट सेनापती बापट रोड येथे डीएसटीएच्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रादरम्यान राज्यातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन, माजी मंत्री, आमदार, संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना युनीट यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. मांजरा परिवाराचे लातूर जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. या परिवारातील साखर कारखान्यांमुळे जिल्ह्यातील ऊस गाळपाचा प्रश्न मार्गी लागला असून मोठया प्रमाणात या उदयोगातून रोजगार निर्मीती, पुरक व्यवसायास चालना मिळाली आहे. प्रारंभी उभारण्यात आलेल्या साखर कारखान्यामुळे लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्न्ती झाली. यासोबत जिल्ह्यातील उदगीर, जळकोट, देवणी तालुक्यासह सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करता यावी यासाठी विलास सहकारी साखर कारखाना लि., युनीट २ च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. आज येथील कारखाना चांगला चालत असून या भागातील शेतकऱ्यांनाही आर्थिक स्थिरता प्राप्त होत आहे. गेल्या हंगामात सर्व विभागात केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करण्यात आले यामध्ये विलास कारखाना युनीट – २ ची कामगिरी सरस ठरल्याने “बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड” पारितोषीक कारखान्यास देण्यात आले आहे. हा पुरस्कार माजी मंत्री, कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.अमित देशमुख, चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, युनीट २ चे कार्यकारी संचालक, सर्व संचालक मंडळासह स्वीकारणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!