महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ ‘मविआ’चे लातुरात काळी फीत लावून आंदोलन

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर : बदलापूर येथे लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या व राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शनिवार (दि.२४) रोजी सकाळी शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीने काळी फीत लावून राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ॲड.किरण जाधव, माजी महापौर स्मिता खानापुरे, शंकर रांजणकर, प्रवीण सूर्यवंशी, सुंदर पाटील कव्हेकर, विजयकुमार धुमाळ यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!