रेपिस्ट म्हणत ट्युशन एरिया परिसरातील विद्यार्थ्यांस मारहाण ; विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान?

2 Min Read
(छायाचित्र - संग्रहित)
(छायाचित्र – संग्रहित)

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर : तू बदलापूरचा आहेस, रेपिस्ट आहेस म्हणून शिकवणी परिसरात एका 16 वर्षीय विद्यार्थ्यांस टोळक्याने मारहाण केली, याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की शनिवार 24 ऑगस्ट रोजी लातूरच्या शिकवणी परिसरात बदलापूर येथील रहिवाशी आणि लातुरात शिक्षणासाठी आलेला 16 वर्षीय विद्यार्थी पृथ्वीराज सावंत हा कॅफेवर बसला असता अतुल कसबे रा. कॉईल नगर हा त्या ठिकाणी आला, त्याने या विद्यार्थ्यास तू बदलापूरचा आहेस, रेपिस्ट आहेस म्हणून छेड काढत मोटार सायकलच्या चावीने डोक्यात मारहाण करत, चावा घेत शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद 16 वर्षीय विद्यार्थ्याने शिवाजीनगर पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अतुल कसबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या फिर्यादी 16 वर्षीय विद्यार्थ्यावर स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय लातूर येथे उपचार करण्यात आले असून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. लातूर हे एक शैक्षणिक हब असून या ठिकाणी राज्याच्या कानकोपऱ्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे, असा सूर नागरिकांचा आहे. याप्रकरणी पृथ्वीराज सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अतुल कसबे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बेस्के हे करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!