न्यू दिशा फिजिक्स क्लास संचालकाकडून ३०० विद्यार्थ्यांची फसवणूक ; फिजिक्स किंग म्हणवून घेणाऱ्या प्रा.शशिधरांकडून पालकांना लाखोंचा गंडा

4 Min Read

हैद्राबादला जाऊन प्रा.शशिधरांच्या मुसक्या आवळा ; पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया

Contents
हैद्राबादला जाऊन प्रा.शशिधरांच्या मुसक्या आवळा ; पालकांच्या संतप्त प्रतिक्रियामुखपत्र दक्षता वृतांतलातूर – राज्यातील विविध जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी लातुरात आलेल्या ३०० विद्यार्थ्यांना न्यू दिशा फिजिक्स क्लासेस चालकाकडून लुबाडण्यात आले. याप्रकरणी फसवणूक झालेले विद्यार्थी, पालक क्लासच्या समोर आक्रमक झाले होते. क्लासेस परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.न्यू दिशा फिजिक्स क्लासेस या क्लासेसने विविध माध्यमातून जाहिराती केल्या होत्या. त्यात ‘न्यू दिशा फिजिक्स क्लासेस कडून फिजिक्स विषयासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात आले होते. त्यानुसार, ३०० विद्यार्थ्यांनी दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. प्रति विद्यार्थी २५ हजार रुपयाप्रमाणे विदयार्थ्यांनी रोख, ऑनलाईन अशा पद्धतीने संचालक प्रा.शशीधर आणि प्रा.चंदनकुमार (सी.के.सर) यांच्याकडे फीस भरली असल्याचे विद्यार्थी- पालक सांगतात. प्रवेश घेईपर्यंत या क्लासचा कारभार व्यवस्थित चालवण्यात आला. शिक्षक व इतर कर्मचारी होते. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणता जून महिन्यात सदर बॅच चालू होणार होती. परंतु संचालकांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे कारणे देत वेळ काढून घेतली मात्र संचालक प्रा. शशिधर यांनी सदरची बॅच सुरु केली नाही त्यानंतर दोन्ही संचालकांचा संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांना लक्षात आले. या प्रकारामुळे ३०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व पालकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याची माहिती मिळत आहे. न्यू दिशा फिजिक्स क्लासचे कार्यालय बंद असल्यामुळे याबाबत अधिकृत कांही समजू शकले नाही.पालकांनो क्लासचालकांवर आंधळा विश्वास नकोक्लासेस संचालकांनी सांगितलेल्या सिलॅबसच्या वेळापत्रकाची, क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची, क्लासेस संचालकांच्या घरापर्यंतच्या माहितीची पडताळणी पालकांनी करणे आवश्यक आहे. क्लासेस चालकांनी केलेल्या दाव्याची वास्तवता जाणून घेण्याची गरज आहे.आपल्या कामात व्यस्त असलेल्या पालकांकडून या सर्व बाबींकडे दूर्लक्ष होते. खोटारड्या जाहिराती करणाऱ्या क्लासेस चालकांना वेळीच रोखणे हेच जबाबदार पालकाचे लक्षण आहे.क्लासचालकांकडे चौकस बुद्धीने पाहण्याची गरजफी चा इंस्टॉलमेंट वेळेत न ​​​​​​​भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले जाते व थकित असलेल्या गरीब विद्यार्थी, पालकांना क्लासेसकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या घटना घडल्याच्या सातत्याने पालकांत चर्चा असतात. तरीही पालक फि ॲडव्हान्स मध्ये भरताना क्लास संचालक कुठे राहतो? त्याचा पूर्व इतिहास काय आहे? त्याचे घर कुठे आहे? क्लासचालकांनी केलेले दावे पूर्ण नाही केले तर फीस परत देऊ शकतो? याचा विचार करताना दिसत नाहीत.प्रा. शशिधर यांच्या उड्याप्रत्यक्ष प्रा.शशिधर यांचा इतिहास पाहिला असता कोरोना काळानंतर ट्युशन एरिया परिसरातील सगळ्या शिकवणी सुरू झाल्या तरी प्रा. शशिधर यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना वेठीस धरले होते. अनेकांनी विनवण्या केल्या तरी त्यांनी लातूर येथे येऊन क्लास सुरू केले नव्हते. माझ्याकडे शिकायचं असेल तर याच पद्धतीने शिका अशा पद्धतीची अरेरावीची भूमिका घेतली होती. त्यानंतर स्वतःचा क्लास बंद करून नांदेड येथील क्लासमध्ये जॉईन झाले त्या ठिकाणी सुद्धा पालकांनी त्यांच्या फिजिक्स विषयावर विश्वास ठेवून फीस भरली मात्र त्यांनी तेथून ही गाशा गुंडाळत लातूर येथील स्टार्क क्लासेस मध्ये रुजू झाले. त्या ठिकाणीही पालकांनी-विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवत फीस भरली परंतु पुढील काळात विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून, पालकांचा विश्वासघात करून अर्ध्यातूनच संबंधित क्लास सोडून स्वतःचे न्यू दिशा फिजिक्स क्लासेस या नावाने क्लास सुरु केला. येथेही पालकांनी विश्वास दाखवला आणि परत त्यांनी विद्यार्थी पालकाचा विश्वासघात केल्याचे संतप्त प्रतिक्रिया लातूरकरांतून येत आहे. काही पालकांनी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या प्रा.शशिधर यांच्या हैदराबाद येथून मुसक्या आवळण्यात याव्यात अश्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासोबतच मागील दहा वर्षात लातूरमध्ये क्लासेसच्या माध्यमातून प्रा.शशिधर यांनी कमावलेली संपत्तीची हैदराबाद येथे गुंतवणूक केली आहे त्या संपत्तीचा ताबा घेऊन फी वसूल करून देण्यात यावी अशीही मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर – राज्यातील विविध जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी लातुरात आलेल्या ३०० विद्यार्थ्यांना न्यू दिशा फिजिक्स क्लासेस चालकाकडून लुबाडण्यात आले. याप्रकरणी फसवणूक झालेले विद्यार्थी, पालक क्लासच्या समोर आक्रमक झाले होते. क्लासेस परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

न्यू दिशा फिजिक्स क्लासेस या क्लासेसने विविध माध्यमातून जाहिराती केल्या होत्या. त्यात ‘न्यू दिशा फिजिक्स क्लासेस कडून फिजिक्स विषयासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात आले होते. त्यानुसार, ३०० विद्यार्थ्यांनी दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. प्रति विद्यार्थी २५ हजार रुपयाप्रमाणे विदयार्थ्यांनी रोख, ऑनलाईन अशा पद्धतीने संचालक प्रा.शशीधर आणि प्रा.चंदनकुमार (सी.के.सर) यांच्याकडे फीस भरली असल्याचे विद्यार्थी- पालक सांगतात. प्रवेश घेईपर्यंत या क्लासचा कारभार व्यवस्थित चालवण्यात आला. शिक्षक व इतर कर्मचारी होते. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणता जून महिन्यात सदर बॅच चालू होणार होती. परंतु संचालकांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे कारणे देत वेळ काढून घेतली मात्र संचालक प्रा. शशिधर यांनी सदरची बॅच सुरु केली नाही त्यानंतर दोन्ही संचालकांचा संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांना लक्षात आले. या प्रकारामुळे ३०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व पालकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याची माहिती मिळत आहे. न्यू दिशा फिजिक्स क्लासचे कार्यालय बंद असल्यामुळे याबाबत अधिकृत कांही समजू शकले नाही.

पालकांनो क्लासचालकांवर आंधळा विश्वास नको

क्लासेस संचालकांनी सांगितलेल्या सिलॅबसच्या वेळापत्रकाची, क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची, क्लासेस संचालकांच्या घरापर्यंतच्या माहितीची पडताळणी पालकांनी करणे आवश्यक आहे. क्लासेस चालकांनी केलेल्या दाव्याची वास्तवता जाणून घेण्याची गरज आहे.आपल्या कामात व्यस्त असलेल्या पालकांकडून या सर्व बाबींकडे दूर्लक्ष होते. खोटारड्या जाहिराती करणाऱ्या क्लासेस चालकांना वेळीच रोखणे हेच जबाबदार पालकाचे लक्षण आहे.

क्लासचालकांकडे चौकस बुद्धीने पाहण्याची गरज

फी चा इंस्टॉलमेंट वेळेत न ​​​​​​​भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले जाते व थकित असलेल्या गरीब विद्यार्थी, पालकांना क्लासेसकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या घटना घडल्याच्या सातत्याने पालकांत चर्चा असतात. तरीही पालक फि ॲडव्हान्स मध्ये भरताना क्लास संचालक कुठे राहतो? त्याचा पूर्व इतिहास काय आहे? त्याचे घर कुठे आहे? क्लासचालकांनी केलेले दावे पूर्ण नाही केले तर फीस परत देऊ शकतो? याचा विचार करताना दिसत नाहीत.

प्रा. शशिधर यांच्या उड्या

प्रत्यक्ष प्रा.शशिधर यांचा इतिहास पाहिला असता कोरोना काळानंतर ट्युशन एरिया परिसरातील सगळ्या शिकवणी सुरू झाल्या तरी प्रा. शशिधर यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना वेठीस धरले होते. अनेकांनी विनवण्या केल्या तरी त्यांनी लातूर येथे येऊन क्लास सुरू केले नव्हते. माझ्याकडे शिकायचं असेल तर याच पद्धतीने शिका अशा पद्धतीची अरेरावीची भूमिका घेतली होती. त्यानंतर स्वतःचा क्लास बंद करून नांदेड येथील क्लासमध्ये जॉईन झाले त्या ठिकाणी सुद्धा पालकांनी त्यांच्या फिजिक्स विषयावर विश्वास ठेवून फीस भरली मात्र त्यांनी तेथून ही गाशा गुंडाळत लातूर येथील स्टार्क क्लासेस मध्ये रुजू झाले. त्या ठिकाणीही पालकांनी-विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवत फीस भरली परंतु पुढील काळात विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून, पालकांचा विश्वासघात करून अर्ध्यातूनच संबंधित क्लास सोडून स्वतःचे न्यू दिशा फिजिक्स क्लासेस या नावाने क्लास सुरु केला. येथेही पालकांनी विश्वास दाखवला आणि परत त्यांनी विद्यार्थी पालकाचा विश्वासघात केल्याचे संतप्त प्रतिक्रिया लातूरकरांतून येत आहे. काही पालकांनी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या प्रा.शशिधर यांच्या हैदराबाद येथून मुसक्या आवळण्यात याव्यात अश्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासोबतच मागील दहा वर्षात लातूरमध्ये क्लासेसच्या माध्यमातून प्रा.शशिधर यांनी कमावलेली संपत्तीची हैदराबाद येथे गुंतवणूक केली आहे त्या संपत्तीचा ताबा घेऊन फी वसूल करून देण्यात यावी अशीही मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!