‘हातभट्टीमुक्त लातूर’ साठी डीआयजी शहाजी उमाप ॲक्शन मोडवर 

1 Min Read

 

Contents
मुखपत्र दक्षता वृतांतलातूर / प्रतिनिधि: नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारताच नांदेड परीक्षेत्रातील लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध मोहीम उघडत विशेष पथके स्थापन करून दि.१ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत तब्बल ३७६ अवैध व्यावसायिकावर कारवाई केली. त्यानंतर आता दहा दिवसांनंतर ‘हातभट्टीमुक्त लातूर’ साठी दि.२५ ऑगस्ट रोजी एका दिवसांत तब्बल ४१ अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत सहा लाख दहा हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाच्या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.लातुरात स्किल गेमचा चोरधंदा स्वत:चे सॉफ्टवेअर तयार करून काहींनी शहरात स्किल गेमच्या नावाखाली सर्रासपणे अवैध जुगार सुरू केला आहे. चोरी- छुपे स्किल गेमच्या नावाखाली आमिष दाखवून जुगार खेळवून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला जात आहे. मागील कांही काळापासून तरुणांमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे स्किल गेमसारख्या अवैध जुगाराकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात स्किल गेमच्या नावाखाली अवैध जुगाराच्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. कर्तव्यदक्ष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकामार्फत स्किल गेमच्या आडून सुरु असलेल्या जुगार अड्डयावर ही विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर / प्रतिनिधि: नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारताच नांदेड परीक्षेत्रातील लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध मोहीम उघडत विशेष पथके स्थापन करून दि.१ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत तब्बल ३७६ अवैध व्यावसायिकावर कारवाई केली. त्यानंतर आता दहा दिवसांनंतर ‘हातभट्टीमुक्त लातूर’ साठी दि.२५ ऑगस्ट रोजी एका दिवसांत तब्बल ४१ अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत सहा लाख दहा हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाच्या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

लातुरात स्किल गेमचा चोरधंदा

 स्वत:चे सॉफ्टवेअर तयार करून काहींनी शहरात स्किल गेमच्या नावाखाली सर्रासपणे अवैध जुगार सुरू केला आहे. चोरी- छुपे स्किल गेमच्या नावाखाली आमिष दाखवून जुगार खेळवून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला जात आहे. मागील कांही काळापासून तरुणांमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे स्किल गेमसारख्या अवैध जुगाराकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात स्किल गेमच्या नावाखाली अवैध जुगाराच्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. कर्तव्यदक्ष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकामार्फत स्किल गेमच्या आडून सुरु असलेल्या जुगार अड्डयावर ही विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!