अवैध सावकारी:दोघांवर विवेकानंद चौक पोलिसांत गुन्हा दाखल; सावकारानं ३२ लाखांचं कर्ज ६० लाखांवर नेलं

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर: अवैध सावकारी करून शेतकऱ्याची जमीन हडपल्याप्रकरणी शहरातील दगडू माधवराव पाटील व मारूती लक्ष्मण बिराजदार दोघे रा. संत ज्ञानेश्वर नगर, एलआयसी कॉलनी लातूर यांच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाई नंतर अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील औसा रोड परिसरातील सुदर्शन गिरीधर पाटील यांनी दगडू माधवराव पाटील व मारूती लक्ष्मण बिराजदार यांच्याकडून बत्तीस लाख रूपये ५ वर्षांसाठी व्याजाने घेतले. त्यावेळी हमी म्हणून सुदर्शन पाटील यांनी हिसामनगर (माटेगडी) ता. देवणी येथील १ हेक्टर ७३ आर जमिनीचे नाममात्र खरेदीखत केले. त्यानंतर सुदर्शन पाटील यांनी रक्कम परत केली. त्यानंतर ते जमीन परत करत नव्हते. त्या दोघा अवैध सावकारांनी ३२ लाखांचे ६०.५० लाख केले. याबाबत सुदर्शन पाटील यांनी लातूर सहाय्यक निबंधक (सहकार) यांच्याकडे तक्रार केली. यानंतर सहकार विभागाने विशेष पथके तयार करून दगडू पाटील व मारूती बिराजदार यांच्या घर व व्यवसायाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात छापेमारी केली असता त्यांच्याकडे संशयास्पद बाँड व कागदपत्रं मिळून आल्यानंतर श्रीमती आर. एफ. हिंगले सहकार अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, लातूर यांच्या फिर्यादीवरून दगडू माधवराव पाटील, मारूती लक्ष्मण बिराजदार यांच्या विरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेकानंद चौक पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!