उदगीरात महिलेचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी ,गुन्हा दाखल

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

उदगीर / प्रतिनिधी : शहरातील एका भागात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेच्या घरासमोर जाऊन तिचा हात ओढून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांनी सांगितले की उदगीर शहरात एका भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोपी सरफराज अहमद शेख वय २८ वर्षे याने महिलेच्या घरासमोर येऊन आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून तिचा हात धरून ओढला व माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला खूप आवडतेस असे म्हणून फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न करून तिची छेड काढली. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सदरील घटना घडल्यानंतर पीडित महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम हे करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!