मुखपत्र दक्षता वृतांत
किल्लारी : एका १८ वर्षीय मुलीची छेड काढून तिला त्रास दिल्याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणासह तिघांविरोधात किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित तिघांना किल्लारी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १८ वर्षीय मुलगी घराकडे पायी जात होती. या मुलीची छेड काढून त्रास दिल्याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणासह तिघांविरोधात किल्लारी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ ऑगस्ट रोजी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन तरुणासह तिघांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास किल्लारी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विशाल शहाणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.