पुणे शहर भाजपा महीला मोर्चा यांच्या मागणीला यश

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

पुणे / सुनील कांबळे : बदलापूर येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने त्वरीत शहरातील सर्व शाळा चालक व मुख्याध्यापकांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत बैठक घ्यावी अशी पुणे शहर भाजप महीला मोर्चा च्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती .

भाजप महीला मोर्चाच्या वतीने केलेल्या मुख्य मागणीची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्वरीत दखल घेत पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शहरातील सर्व शाळांसाठी दि.29/8/2024 गणेश कला क्रीडा मंच येथे ‘शालेय सुरक्षा परिषद’ आयोजित करण्यात आली. शालेय विद्यार्थी आणि महिलांची सुरक्षा हा या अधिवेशनाचा प्रमुख विषय होता. यावेळी पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकारी, शहरातील सर्व शाळांचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!