मांजरा परिवार विश्वासार्हतेचा लोकप्रिय ब्रँड- सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख 

4 Min Read

विलास साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा संपन्न

Diliprao Deshmukh Latur

Contents
विलास साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा संपन्नमुखपत्र दक्षता वृतांतलातूर / प्रतिनिधी : राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने बँका आणि इतर संस्थानी प्रयोगशील राहून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा उद्देश साध्य केला आहे, त्यामुळे मांजरा हा  विश्वासहर्तेचा ब्रँड तयार झाला आहे, ही विश्वासार्हता कधीही कमी होऊ दिली जाणार नाही असा विश्वास, माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केला.विकास कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवळी येथील कारखाना साइटवर कारखान्याची २२ वी सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमळीच्या वातावरणात पार पडली या सभेत या सभेत मांजरा परिवाराचे आधारवड दिलीपरावजी देशमुख यांचा डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट संस्थेकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आ.धीरज देशमुख आणि लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ.शिवाजी काळगे, धाराशिवचे खा.ओम राजेनिंबाळकर यांचा या सभेत यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री आ.अमित देशमुख, रीड लातूरच्या संस्थापिका दिपशिखा धिरज देशमुख, माजी आ.वैजनाथ शिंदे, कारखान्याचे व्हा. चेअरमन, कार्यकारी संचालक युनिट २ चे कार्यकारी संचालक, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हॉइस चेअरमन समद पटेल, कल्याण पाटील, सचिन दाताळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट या संस्थेकडून माझा झालेला सन्मान हा प्रातिनिधीक स्वरूपाचा होता, या सन्मानासाठी मांजरा परिवारातील प्रत्येक घटक तेवढाच हक्कदार आहे त्यामुळे मी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आहे, मांजरा परिवाराची सुरुवात, ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने मांजरात कारखान्याची स्थापना करून झाली आहे, माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे ग्रामीण विकासाच्या स्वप्न साकार करण्यासाठी आज मांजरा परिवारातील प्रत्येक संस्था आणि त्या संस्थेची निगडित असलेला प्रत्येक माणूस प्रयत्नशील आहे, या कार्यातील सर्वांचे योगदानच एकूण यशा मागचे गमक आहे असे मी मानतो आहे. आधी केले मग सांगितले या युक्तीप्रमाणे मांजरा परिवारात चांगले निर्णय घेतले जातात, त्यावर अंमलबजावणी केले जाते आणि मग इतर समोर त्याचे परिणाम ठेवले जातात, यातून मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात आणि देशात मांजरा परिवाराचा आदर्श अनुकरणीय पॅटर्न तयार झाला आहे. आता हा परिवार जिल्हा पुरता मर्यादित राहिला नसून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कारखाना आदर्श पद्धतीने चालवून इतरांना त्या त्या पद्धतीचे कार्य करण्याची प्रेरणा देत असल्याचेही त्यांनी म्हंटले.या सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेले सर्व शेतकरी सभासद आणि लातूर, धाराशिव जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी कारखान्याचे संचालकांसह ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार, तोडणी ठेकेदार मांजरा परिवारातील सर्व कारखान्याचे संचालक, खातेप्रमुख, अधिकारी, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा प्रारंभ लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पन करून झाला, त्यानंतर दिपप्रज्वलन झाले, विषय पत्रिका वाचन कार्यकारी संचालकांनी केले तर अहवाल वाचन व्हा.चेअरमन यांनी केले, संचालक पाटील यांनी अनुमोदन दिले. हंगामात चांगली कामगीरी केलेल्या वाहतुक, तोडणी ठेकेदार, हार्वेस्टर ठेकेदार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल इंगळे पाटील यांनी तर आभार अमर मोरे यांनी मानले.बदलत्या तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीला मोठे भवितव्य- आ.अमित देशमुखतंत्रज्ञानात होत असलेल्या संशोधनामुळे उसापासून उपपदार्थ निर्मिती आणि त्याच्या वापरात क्रांतिकारी बदल घडून येत आहेत, या परिस्थितीत ऊस शेतीला मोठे भवितव्य असून हे ऊसउत्पादन वाढवण्यासाठी मराठवाड्यात मोठा वाव असल्याचे माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर / प्रतिनिधी : राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने बँका आणि इतर संस्थानी प्रयोगशील राहून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा उद्देश साध्य केला आहे, त्यामुळे मांजरा हा  विश्वासहर्तेचा ब्रँड तयार झाला आहे, ही विश्वासार्हता कधीही कमी होऊ दिली जाणार नाही असा विश्वास, माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केला.

विकास कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवळी येथील कारखाना साइटवर कारखान्याची २२ वी सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमळीच्या वातावरणात पार पडली या सभेत या सभेत मांजरा परिवाराचे आधारवड दिलीपरावजी देशमुख यांचा डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट संस्थेकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आ.धीरज देशमुख आणि लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ.शिवाजी काळगे, धाराशिवचे खा.ओम राजेनिंबाळकर यांचा या सभेत यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री आ.अमित देशमुख, रीड लातूरच्या संस्थापिका दिपशिखा धिरज देशमुख, माजी आ.वैजनाथ शिंदे, कारखान्याचे व्हा. चेअरमन, कार्यकारी संचालक युनिट २ चे कार्यकारी संचालक, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हॉइस चेअरमन समद पटेल, कल्याण पाटील, सचिन दाताळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट या संस्थेकडून माझा झालेला सन्मान हा प्रातिनिधीक स्वरूपाचा होता, या सन्मानासाठी मांजरा परिवारातील प्रत्येक घटक तेवढाच हक्कदार आहे त्यामुळे मी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आहे, मांजरा परिवाराची सुरुवात, ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने मांजरात कारखान्याची स्थापना करून झाली आहे, माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे ग्रामीण विकासाच्या स्वप्न साकार करण्यासाठी आज मांजरा परिवारातील प्रत्येक संस्था आणि त्या संस्थेची निगडित असलेला प्रत्येक माणूस प्रयत्नशील आहे, या कार्यातील सर्वांचे योगदानच एकूण यशा मागचे गमक आहे असे मी मानतो आहे. आधी केले मग सांगितले या युक्तीप्रमाणे मांजरा परिवारात चांगले निर्णय घेतले जातात, त्यावर अंमलबजावणी केले जाते आणि मग इतर समोर त्याचे परिणाम ठेवले जातात, यातून मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात आणि देशात मांजरा परिवाराचा आदर्श अनुकरणीय पॅटर्न तयार झाला आहे. आता हा परिवार जिल्हा पुरता मर्यादित राहिला नसून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कारखाना आदर्श पद्धतीने चालवून इतरांना त्या त्या पद्धतीचे कार्य करण्याची प्रेरणा देत असल्याचेही त्यांनी म्हंटले.

या सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेले सर्व शेतकरी सभासद आणि लातूर, धाराशिव जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी कारखान्याचे संचालकांसह ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार, तोडणी ठेकेदार मांजरा परिवारातील सर्व कारखान्याचे संचालक, खातेप्रमुख, अधिकारी, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पन करून झाला, त्यानंतर दिपप्रज्वलन झाले, विषय पत्रिका वाचन कार्यकारी संचालकांनी केले तर अहवाल वाचन व्हा.चेअरमन यांनी केले, संचालक पाटील यांनी अनुमोदन दिले. हंगामात चांगली कामगीरी केलेल्या वाहतुक, तोडणी ठेकेदार, हार्वेस्टर ठेकेदार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल इंगळे पाटील यांनी तर आभार अमर मोरे यांनी मानले.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीला मोठे भवितव्य- आ.अमित देशमुख

तंत्रज्ञानात होत असलेल्या संशोधनामुळे उसापासून उपपदार्थ निर्मिती आणि त्याच्या वापरात क्रांतिकारी बदल घडून येत आहेत, या परिस्थितीत ऊस शेतीला मोठे भवितव्य असून हे ऊसउत्पादन वाढवण्यासाठी मराठवाड्यात मोठा वाव असल्याचे माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!