ग्रामसेवकाची माहिती देण्यास टाळाटाळ; मुरुड येथील युवकांचे पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर / प्रतिनिधी : माहिती अधिकारात माहिती मागितलेल्या विषयाची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुरुड येथील ग्रामसेवकावर कारवाई करावी,  अशी मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप करत मौजे मुरुड येथील १)शरीफ युन्नुस सय्यद, २) अनिल रामहरी ढोबळे,३) विशाल अण्णा कणसे या रहिवाशांनी मंगळवार (ता.३) रोजीपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लातूर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथील ग्रामसेवक यांची ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जाची कसल्याही प्रकारची दाखल घेत
नसल्याने त्यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आलेल्या अर्जावरील वरिष्ठ अपिलीय अधिकारी यांनी माहिती देण्यास आदेश देऊनही त्या आदेशाची अवहेलना करत मुरुड ग्रामपंचायत मध्ये काही सदस्यांच्या सांगण्यावरून मनमानी कारभार संगनमताने करत असून शासन निर्णयाला व आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. माहिती अधिकारात माहिती मागितलेल्या विषयाची माहिती देत नसल्याने व जाणून-बुजून, हेतुपुरस्सर, माहिती लपवत आहेत व खरी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे याच्या मागे मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची दाट शक्यता आहे, असा आरोप उपोषणकर्त्यानी केला आहे.
ग्रा.पं. मुरुड येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!