लातूर : राज्य विधिमंडळाचे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. २०२१-२२ वर्षासाठी ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कारांने शिक्षक आमदार विक्रम काळे यांना सन्मानित करण्यात आले. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव इब्राहीम सय्यद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रा.काँ.पा चे उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष ताज शेख, राजू हलवाई, प्रा.दीपक पाचंगे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष टिल्लू शेख, आवेज खान, नाडे सर, हातीम शेख आदी मान्यवरासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.