उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाल्याबद्दल आ. विक्रम काळेंचा सत्कार 

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर : राज्य विधिमंडळाचे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. २०२१-२२ वर्षासाठी ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कारांने शिक्षक आमदार विक्रम काळे यांना सन्मानित करण्यात आले. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव इब्राहीम सय्यद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी रा.काँ.पा चे उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष ताज शेख, राजू हलवाई, प्रा.दीपक पाचंगे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष टिल्लू शेख, आवेज खान, नाडे सर, हातीम शेख आदी मान्यवरासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!