वडिलांच्या हत्येसाठी मुलानेच दिली सुपारी:जटिल खुनाच्या गुन्ह्याची वजीराबाद पोलिसांनी केली उकल

2 Min Read

Nanded - Vajirabad Police

मुखपत्र दक्षता वृतांत

नांदेड/प्रतिनिधी : शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृताच्या मुलांसह तिघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी मुलाने वडिलांची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचे सत्य मान्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
काय होते संपूर्ण प्रकरण वृत्तानुसार, १ सप्टेंबर रोजी शेख युनूस शेख पाशा नावाच्या हॉटेल व्यावसायिकाची त्याच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर वजीराबाद पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखत वजीराबाद पोलिसांनी गुन्ह्याची उकल होण्याच्या दृष्टीने तपासचक्रे फिरवली होती. पोलिसांच्या तपासात मृत्यूचे गुढ उलगडले असून मुलानेच त्याच्या वडिलाच्या हत्येसाठी सुपारी दिली असल्याचं समोर आलं आहे. वडील आणि मुलामध्ये दररोज क्षुल्लक कारणावरून वाद होत होते. मात्र वाद वाढत गेल्याने आरोपी मुलगा शेख अजमद शेख इसाक याने वडिलांची हत्या घडवून आणली. पोलिसांनी संशयित आरोपी शेख अजमद शेख इशाक याच्यासह तिघांना ताब्यात घेतले आहे. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता १० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील अधिक तपास वजीराबाद पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती किरितिका सी.एम. यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि आर.डी वटाने, सपोनि प्रशांत लोंढे, पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, बालाजी कदम, रमेश सुर्यवंशी, इम्रान शेख, भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार व सायबर सेल नांदेड येथील पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!