मुखपत्र दक्षता वृतांत
वलांडी/ प्रतिनिधि : मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखानदारी हा धंदा म्हणून न करता सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी म्हणून कारखानदारी चालवीत आहोत यामुळेच डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार हा संपूर्ण मांजरा परिवाराचा आहे, असे प्रतिपादन वलांडी येथे सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सहकारमहर्षी माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी केले.
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे या संस्थेचा साखर उद्योग गौरव पुरस्कार नुकताच सहकारमहर्षी माजीमंत्री दिलीपरावजी देशमुख यांना देऊन गौरविण्यात आले. याबद्दल निलंगा मतदार संघाच्या वतीने श्री.देशमुख यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन डॉक्टर काँग्रेस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद भातंब्रे यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आ. त्रिंबक भिसे, खा.शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मल्लिकार्जुन मानकरी हे होते तर व्यासपीठावर माजी आ.धर्माजी सोनकवडे, अशोक पाटील निलंगेकर बसवराज पाटील नागराळकर, लक्ष्मणराव मोरे यशवंतराव पाटील, सोनू डगवाले, अभय साळुंखे, सरपंच राणीताई भंडारे, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील, अजित बेळकोने, सुधीर मसलगे, सुतेज माने अजित नाईकवाडी, अशोक कोरे, जावेद तांबोळी, इस्माईल लदाफ, मदन बिरादार, व्यंकटराव हंद्राळे, अविनाश रेशमे, भागवत वंगे, शरण लुल्ले, अमर मुर्के, सुनील नाईकवाडी, सतीश शिवने, दीपक स्वामी, आरती भंडारे, अयोध्या पेठकर, प्रेरणा जाधव, मीनाताई बंडले, करुणा पारशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी निलंगा मतदार संघात इच्छुक असलेल्या अशोक पाटील निलंगेकर, अभय साळुंके, डॉ.अरविंद भातंब्रे, अजित माने या उमेदवारासमोरच निलंगा मतदार संघांचे नेतृत्व दिलीपराव देशमुख यांनी करावे अशी विनंती बस्वराज पाटील नागराळकर यांनी केली मात्र दिलीपराव देशमूखांनी त्याला नकार देत आपण कोणतीच निवडणूक लढवणार नाही, असे सूचक विधान केले.