जैनधर्मीयांच्या पदाधिकाऱ्यांनी मानले पोलीस प्रशासनाचे आभार 

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर/ साईनाथ घोणे : जैनधर्मीयांच्या पर्युषण पर्व काळात दोन दिवससर्व कत्तलखाने, मांस विक्री बंदीचा निर्णय आल्यानंतर अखेर या निर्णयानुसार प्रशासनातर्फे कडक अंमलबजावणी करण्यात आली. पर्युषण पर्वाच्या पहिल्या दिवशी आणि शेवटचा दिवस म्हणजे ३१ ऑगस्ट व ७ सप्टेंबरला मांस विक्री बंद ठेवण्यात आली.

शासनाच्या या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी करून पोलीस प्रशासनाने हजारो मुक प्राण्यांना अभयदान दिल्याबद्दल जैनधर्मीयांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा सत्कार करून पोलीस प्रशासनाचे आभार मानले. या प्रसंगी पोलीसमित्र सुरेशचंद कर्नावट जैन, प्राणीमित्र किरण ब्रह्मेचा, राजेश डुंगरवाल, सुनील बेदमुथा, ॲड.विशाल पोकर्णा, शुभम संकलेचा, विवेक कुचेरिया आदी जैन बांधव उपस्थित होते.

कडक अंमलबजावणी केल्याबद्दल आभार :सुरेशचंद कर्नावट जैन

जैनधर्मीयांच्या वतीने सरकारकडे आठ दिवस बंदीची मागणी करण्यात आली मात्र पूर्वीच्या निर्णयानुसार दोनच दिवस बंदी राहील, अशी माहिती देण्यात आली. तरीही प्रशासनाच्या वतीने दोन दिवस या कत्तलखाणे, मांस विक्री बंद ची कडक अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!