जिल्ह्यात वंचितची एक लाख सदस्य नोंदणी करणार – विनोद खटके

1 Min Read



मुखपत्र दक्षता वृतांत
लातूर / प्रतिनिधी : शहरातील बार्शी रोड येथील हॉटेल केसरीनंदन येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन लातुरच्या वतीने नुकताच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्या बद्दल विनोद खटके जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सिद्धार्थ सुर्यवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.कल्याण कांबळे व प्रा. शिवाजीराव गाडे हे होते. व्यासपीठावर सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते सरफराज पठाण, सचिन लामतुरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष रोहन सावंत होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी मनोगतात विनोद खटके यांच्या येण्याने वंचित बहुजन आघाडीला बळ आले असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना विनोद खटके यांनी वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्ह्यात एक लाख सदस्य नोंदणी करणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थ्यानी सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेड जिल्हा निरीक्षक प्रीतम दंडे, रोहित साबळे, प्रेम घोबाळे, अक्षय कांबळे, रंजित बनसोडे, उत्तम कांबळे, शुभम बचुटे व सम्यक विद्यार्थी आंदोलन लातुर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!