लातूर : सामाजिक कार्यकर्ते तथा लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव ॲड.प्रदिपसिंह गंगणे, ॲड.रतीकांत गंगणे, श्रीकांत गंगणे यांचे वडील तुळशीदास गंगणे यांचे दि.१४.०९.२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी गंगणे परिवाराची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष ॲड.व्यंकट बेंद्रे, माजी नगरसेवक नवनाथ आलटे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष लाला सुरवसे आदी उपस्थित होते.