मुखपत्र दक्षता वृतांत
लातूर / प्रतिनिधी : स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत मिशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त लातूर तालुक्यातील गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेचे आयोजन सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक अमीरूल हसन अंसारी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले होते. यावेळी सीआरपीएफ जवानांनी लातूर जिल्ह्यातील गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यालय व परिसर स्वच्छ केला.