नियमाचे उल्लंघन: गणेश मंडळावर गुन्हा दाखल

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

देवणी / प्रतिनिधी : यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत गणरायाच्या विसर्जनासाठी ठराविक वेळ देऊनही वेळेचे उल्लंघन करून वाद घालत डॉल्बी वाजविणाऱ्या तालुक्यातील गौंडगाव (विजयनगर) येथील एका गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी डॉल्बीचे साहित्यही जप्त केले आहे.

देवणी तालुक्यातील नवयुवक गणेश मंडळाने रविवार (दि. १५) रोजी रात्री ११ वाजेपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक चालू ठेवली. या मिरवणुकीत डॉल्बीही मोठ्या आवाजात लावला होता. सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होईल, असे वर्तन केले. मंडळाला विसर्जनासाठी दिलेली वेळ संपली तरी त्यांनी मिरवणूक सुरूच ठेवली. मिरवणूक लवकर संपवा, डॉल्बी बंद करा, असे पोलिसांनी सांगितल्यानंतरही ‘तुम्हाला काय करायचे आहे, ते करून घ्या, आता तर ११ वाजलेत’ अशी उद्धट भाषा पोलिसांना वापरली. याप्रकरणी देवणी पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!