संजीवनी वनौषधी बेटावर वैद्य संमेलन-२०२४ संपन्न 

2 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

वडवळ नागनाथ / प्रमोद घोणे : येथील संजीवनी वनौषधी बेटावर उतरा नक्षत्रात सुरु झालेल्या यात्रेत रुग्ण, वैद्य, विद्यार्थी, पर्यटक आणि नागरिकांची गर्दी झाली आहे. यासर्वांना वनौषधींची माहिती व्हावी, याकरीता वडवळ (ना.)ग्रामपंचायतीच्या वतीने संजीवनी बेटाच्या पायथ्याला मंगळवार (ता.१७) रोजी ‘वैद्य संमेलनना’चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उदघाट्न जिल्हाधिकारी वर्षा घुगे – ठाकूर यांच्या हस्ते पार पाडले. 

या वैद्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अहमदपूर विधानसभा मतदारसंघांचे आमदार बाबासाहेब पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा सहआयुक्त नगरपंचायत रामदास कोकरे, उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, सहाय्यक वनसंरक्षक वृषाली तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणमंत वडगावे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, वनपरीक्षेत्र अधिकारी वर्षा नागरगोजे, चाकूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सरपंच मुरलीधर सोनकांबळे, ग्रामविकास अधिकारी विजयानंद देशमुख, उपसरपंच बालाजी गंदगे, मंडळअधिकारी श्याम कुलकर्णी, तलाठी दिपक जायभाये यांची उपस्थिती होती.

 

( लातूर जिल्ह्यातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मुखपत्र दक्षता व्हॉट्सॲप चॅनेल जॉईन करा लिंक – https://whatsapp.com/channel/0029VaElDqqFMqreZLkjgl3I )

 

या संमेलनात मराठवाड्यातील नामवंत वैद्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित राहून बेटावरील वनौषधींची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठया संख्येने रुग्ण, पर्यटक, विद्यार्थी, नागरिकांची उपस्थिती होती.

या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील वैद्य आणि रुग्ण येथे येऊन गुणकारी दुर्मीळ वनौषधींच्या झाडांचा पाला खातात, ज्यामुळे विविध प्रकार आजाराचे उपचार होतात. 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!