मदनी चौक यंगर्स युनीटीच्या वतीने अन्नदान
लातूर / साईनाथ घोणे : जगाला मानवता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे व इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जश्ने ईद ए मिलादुन्नबी लातूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जश्ने ईद ए मिलादुन्नबी निमित्त मदनी चौक यंगर्स युनीटी लातूरच्या वतीने गोर गरीब गरजूंना अन्नदान करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहीम सय्यद हे होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी जगाला दिलेला शांती व एकात्मतेचा संदेश ही काळाची गरज आहे, सर्व मानव जाती आपसात भाऊ-भाऊ आहेत, सर्वानी एकमेकांच्या धर्माचा सन्मान केला पाहिजे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अहमद खान, माजी उपमहापौर कैलास कांबळे, युवा नेते शाहबाज़ खान, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष ताज शेख, आवेज खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदनी चौक यंगर्स युनिटीचे अध्यक्ष शेख अयुब, शेख बिलाल, शेख जमीर, शेख जूनैद, फैयाज पठाण, रियाज़ सय्यद, रियाज़ पठाण, इम्तियाज शेख आदींनी परिश्रम घेतले.