मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज लातूर जिल्हा बंदची हाक

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देत सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (दि.२३) रोजी लातूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये समाजबांधवांनी उस्फुर्त सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील हे सातत्याने संघर्ष करीत आहे. सरकार व विरोधक मराठा आरक्षणाबाबत उदासीन असल्याची स्थिती आहे. शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्याने अनेक युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. आर्थिक हतबलतेने अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत आहे. यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळणे हाच एकमेव पर्याय आहे. हे आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठायोद्धे मनोज जरांगे-पाटील हे प्राणांतिक उपोषण करीत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र शासन हा विषय मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!