सिद्धी शुगरमध्ये ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत २९ तरूणांना नियुक्तीपत्र वाटप

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

अहमदपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, 9, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि ‘मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष’ यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविली जात असून रोजगार इच्छुक युवक-युवती आणि उद्योजक आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. प्रत्येक युवक-युवतींना शिक्षणानुरूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य’ उपयुक्त ठरत आहे. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत सिद्धी शुगर अँड अलाईड इंडिया लि., उजना या ठिकाणी २९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त उमेदवारांना दि. १ ऑक्टोबर रोजी रुजू करून घेण्यात येणार आहे. सिद्धी शुगर तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. 

 

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने येणार आहे. या उपक्रमांर्तगत बारावी, आय.टी.आय.,पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांनी व रोजगार देणा-या विविध आस्थापनांनी, उद्योजकांनीही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

 

#Ahmedpur #chakur #मुख्यमंत्रीयुवाकार्यप्रशिक्षणयोजना 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!