जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरट्यांचा डल्ला;तेरा संगणकाची धाडसी चोरी

1 Min Read
(छायाचित्र – संग्रहित)

चाकूर : येथील जिल्हा परिषद शाळेतून अज्ञात चोरट्यांनी संगणकांसह संचाची चोरी केल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्रीच्या वेळी घडली. गुरुवारी (दि.२६) सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.

शाळेचे मुख्याध्यापक -शिक्षक नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत आले असता त्यांना शाळेचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन बघितले असता त्यांना सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी शाळेतील संगणक संचासह वस्तू चोरून नेल्याचे दिसून आले.

यावर मुख्याध्यापक बालाजी बिराजदार यांनी तात्काळ चाकूर पोलीस ठाण्यास माहिती दिली. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकूर पोलीस पुढील तपास करत आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात वाढ होत असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!