पल्मोवर्स कॉन्फरन्समध्ये प्रसिद्ध श्वसन विकार छातीविकार तज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी केले मार्गदर्शन 

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

लातूरः वेल्लोर येथे २३ व २४ सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या देशपातळीवरील पल्मोवर्स कॉन्फरन्समध्ये लातूरचे गायत्री हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध श्वसन विकार छातीविकार तज्ञ डॉ. रमेश भराटे यांना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. रमेश भराटे यांनी बेसिकस ॲाफ ब्रांकोस्कोपी या विषयावर मार्गदर्शन केले. 

ही परिषद प्रा. डॉ. रिचा गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती. जगातील नामवंत डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. डॉ. रमेश भराटे यांनी या कॉन्फरन्समध्ये मांडलेल्या विषयानंतर ख्रिरिश्चन मेडिकल कॉलेजच्या वतीने गौरव करण्यात आला.

या परिषदेमध्ये ब्रांकोस्कोपी, थोरॅकोस्कोपी, रिजीड ब्रॉकोस्कोपी, ईबस (यंडो ब्रांकीयल अल्ट्रासाऊंड) व नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर जगभरातील नामवंत डॉक्टरांनी मंथन केले. या परिषदेस देश विदेशातील डॉ. पट्टाभिरमन, डॉ. हरिकिशन, डॉ नागारजुना मुत्रु, डॉ रमेश भराटे, डॉ रघुकांत, डॉ. रिचा मित्तल, डॉ. सुशील जैन, डॉ. डाबी, डॉ. सोनिया दलाल, डॉ. प्रतिभा सिंगल, डॉ. नईम दार, डॉ. बाला राजु, डॉ. वृषाली खिरीड, डॉ. अपार जिंदाल, डॉ. ऊमा देवराज आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!