तिघांवर पोक्सो, अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा: ‘तुझा मोबाईल नंबर दे’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; गंजगोलाई परिसरातील घटना

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

लातूर : अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला बोलावून छेड काढत विनयभंग केल्याची घटना गंजगोलाई मध्ये घडली आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुरनं ६२७/२४ कलम ७५(१) २,४९, बीएनएस, ३(१) पोक्सो, अ‌ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवार (दि.२७) रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. वाढदिवसासाठी पीडित अल्पवयीन मुलीला गंजगोलाई परिसरातील एका कॅफेमध्ये बोलावून घेतले होते. यावेळी कॅफेमध्ये असलेल्या तिघांमधील एकाने पीडित अल्पवयीन मुलीला तुझा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमध्ये डायल कर असा आग्रह केला, तर दोघांनी त्याला प्रोत्साहन दिले. पिडीत मुलीने विरोध केला असता एकाने बळजबरी केली. आफताब शेख, शाहीद शेख, जमीर शेख (तिघे रा. लातूर) अशी आरोपीची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी गांधी चौक पोलिसांकडून गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपीना अटक करण्यात आली. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे करत आहेत.

छेडछाडी चे प्रमाण वाढले

मागील महिण्यात गुरुवार (दि.२९) रोजी २४ वर्षीय तरुणी सकाळी गूळ मार्केट येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेली असता भाजी विक्रेत्या आरोपीने छेड काढल्याची घटना घडली होती त्यानंतर आता एक महिन्याच्या आतच विनयभंगाची दुसरी घटना घडल्याने नराधमांवर कायद्याचा जरब कमी झाल्याची उलटसुलट चर्चा नागरिकांतून होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!