२२ वर्षात रेणा साखर कारखान्याने कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम केले; रेणाचा उस उत्पादक शेतकऱ्यांना अंतीम दर २७६७ रूपये जाहीर- माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची माहिती

8 Min Read

रेणा साखर कारखान्याचा आसवणी व सौरऊर्जा प्रकल्पाचा शानदार सोहळ्यात शुभारंभ 

मुखपत्र दक्षता वृतांत 

लातूर : राज्यातील सत्ताधारी सरकारच्या कार्यकाळात कुठला घटक समाधानी आहे का? असा सवाल करत महिला सुरक्षित नाहीत शेतकऱ्यांना मदत नाही मजूराना काम नाही पिकाला भाव नाही समाजातील सर्व घटक या महायुती सरकार वर त्रस्त असून लोकशाही दुरुस्त करण्यासाठी खरी ताकद मतदारांत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा व विकास कामे करणाऱ्या काँग्रेसच्या पाठीमागे ऊभे राहावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते रेणापूर तालुक्यांतील निवाडा दिलीपनगर येथील रेणा साखर कारखान्याच्या विस्तारीत ३० kLPD आसवणी व ३५० किलो वॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी करण्यात आला त्याप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे खासदार डॉ.शिवाजीराव काळगे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख. रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी आमदार त्रिंबक भिसे, रेना कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील माजी चेअरमन आबासाहेब पाटील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक ॲड. श्रीपतराव काकडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, रेना साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे, रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे, सचिन दाताळ, संभाजी सूळ, शिवाजी कांबळे, अनुप शेळके, गोविंद देशमुख, संग्राम माटेकर, महादेव उबाळे, गोविंद पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, पृथ्वीराज सिरसाट, गणेश सौदागर यांच्यासह रेणा साखर कारखान्याचे संचालक आदि मान्यवर उपस्थित होते. 

 

विकास कामे करणाऱ्या काँग्रेसच्या पाठीमागे ऊभे रहा

-माजी मंत्री दिलीपराव देशमुख 

यावेळी बोलताना सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी मागच्या ४० वर्षात मांजरा साखर परिवाराने सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे जिथे जाल तिथे आर्थिक विकास करण्याची किमया या परिवाराच्या माध्यमातून झाली आहे असे सांगून रेणा साखर कारखान्याने २२ वर्षात या भागातील लोकांना न्याय देण्याचे काम केले सभासद व संचालक यांच्यात सामंजस्य निर्माण करत कारखान्याने शेतकऱ्यांच्या विश्वास संपादन केला आमची संस्कृती संस्कार हे लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी घालुन दिलेले राजकारण आम्ही करतोय दुसऱ्यावर चिखलफेक करणे टीका करणे आमची संस्कृती नाही असा विरोधकांवर टोला लगावला उत्तर द्यायचे असेल तर आम्ही विकासातून देतोय त्यामुळे विकासाची कामे करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या पाठीमागे ऊभे राहून महायुती सरकारला धडा शिकवावा आम्ही स्नेह वाढवला विकास कामे केली आपला स्नेह कायम पुढेही राहील असा विश्वास व्यक्त करून आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी सहकार्य करावे आमची बांधीलकी आपल्याशी आहे भविष्यातही आपल्याला जे जे चांगल करता येईल ते आपण करू त्यासाठी आपलीं खंबीर साथ काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

 

शेतकऱ्यांचे आधारवड दिलीपराव देशमुख साहेबच – आ.धीरज देशमुख 

 राज्यात देशात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने शेतकऱ्याच्या सोयाबीनला योग्य भाव देण्यासाठी सरकारमध्ये असलेल्या नेत्यांकडे दानत आहे का? असा सवाल करत शेतकर्यांच्या पदरात काहीच नाही नुसत्या घोषणा सुरू आहेत हातात काहीच नाही केवळ उद्गोग वाचले पाहिजेत याकडे सरकारचे जास्त लक्ष असल्याची टीका त्यांनी करत शेतकऱ्यांना आधारच राहिलेला नाही केंद्र राज्य सरकार शेतकऱ्यांना आधार भाव देत नाही निराशा करत आहेत असे यावेळी म्हणत सरकारवर टीका केली.शेतकऱ्यांचे आधारवड दिलीपराव देशमुख साहेबच आहेत असे सांगून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम आपल्या माध्यमातून जिल्हा बँकेकडून होत आहे ५ लाख रुपये बिन व्याजी शेतकऱ्यांना मिळत आहेत त्यामुळे इथला शेतकरी सुखी जगत आहे जिल्हा बँकेने ४ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून बँकेने सामाजिक बांधिलकी म्हणून महिला भगिनींना लाडकी बहिण योजनेसाठी निःशुल्क खाते उघडून देण्याचा निर्णय घेतला त्यात ३२ हजार खाते उघडून दिले त्यामुळे ४ कोटी ८० लाख रुपये महिला भगिनिंचे बचत झाले असेही ते यावेळी म्हणाले..

 

रेणा साखर कारखाना सोलारवर १०० टक्के चालेल

 

रेणा साखर कारखान्याने २२ वर्ष शेतकऱ्यांना एफ आर पी सहीत शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल संचालक मंडळ मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रेनाने अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून काम केले आज २२ वर्षानंतर प्रशासकीय इमारत भूमिपूजन होत आहे याचा उल्लेख करत आधी शेतकऱ्यांना अधिक भाव देणे वेगवेगळे उपपदार्थ निर्मितीकडे भर दिल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न कारखान्याचा राहिलेला आहे आज प्रशासकीय इमारत भूमिपूजन समारंभ होत आहे सामाजिक बांधिलकी म्हणून कारखान्याने शेतकऱ्यांच्या मुलासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निःशुल्क सुरू करून लातूर व निवाडा येथे मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे याचाही उल्लेख केला यावेळी आमदार धीरज देशमुख यांनी केला .

रेणा साखर कारखान्यामुळे परिसरात आर्थिक क्रांती – चेअरमन सर्जेराव मोरे 

यावेळी रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे यांनी आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले की माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या रेणा साखर कारखान्याने २० वर्षात आर्थिक सुबत्ता या भागाला मिळवून दिली आजतागायत कारखान्याच्या माध्यमातून उस उत्पादक शेतकऱ्यांना १ हजार ६०० कोटी रुपये उस गाळप पोटी एफ आर पी सहीत देण्यात आले त्यामुळें आर्थिक क्रांती घडवून आणली त्याच बरोबर रेणा साखर कारखान्यास जिल्हा बँकेची खंबीर साथ मिळाली उच्च शिक्षण घेतलेले नेतृत्व आमदार धीरज देशमुख यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले त्याचा आज हजारों मुलांना फायदा होत आहे असे सांगून आज मांजरा साखर परिवार गेली ५० वर्षापासून सहकारात काम करत असताना मागे वळुन बघितले नाही जिथं जाल तिथं या नेतृत्वाने लोकांना आधार, रोजगार देण्याचं काम केले आहे पथदर्शी नेतृत्व म्हणून सहकार मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली रेणा ने १५ पारितोषिके पटकावली त्यामुळें हे नेतृत्व आपण जपले पाहिजे आगामी काळात आपण खंबीर पने यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले

 

खासदार डॉ शिवाजीराव काळगे, यशवंतराव पाटील यांची समयोचीत भाषणे झाली वार्षिक सर्वसाधारण सभेत डेक्कन शुगर असोशी एशियन पुणे कडून साखर गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यांचा रेणा साखर कारखान्याच्या वतीने सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी खासदार डॉ शिवाजीराव काळगे यांचाही सत्कार करण्यात आला 

 

वार्षिक सर्वसाधारण सभेचे वाचन कार्यकारी संचालक बी व्ही मोरे यांनी केले सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली सर्वसाधारण सभेस मोठा जनसमुदाय सभासद उपस्थित होते

सर्वसाधारण सभेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केल्या घोषणा

 

रेणा साखर कर्मचाऱ्यांना १६.६६ टक्के दिवाळी बोनस जाहीर 

 

दिवाळी निमित्ताने सभासदांना प्रती किलो २५ रुपये प्रमाणे ५० किलो साखर देणार

 

मांजरा साखर परिवारातील सर्वाधिक दर देण्याचा प्रथम क्रमांक रेणा साखर कारखाना ठरलेला आहे एफ आर पी दर २६६७ रुपये असून त्यापेक्षा अधिक १०० रुपये वाढवून दिल्याने २७६७ रुपये अंतिम दर जाहीर केला आहे त्याचे उपस्थित सभासदांकडून स्वागत करण्यात आले आहे.

यावेळी रेणा साखर कारखान्याचे संचालक मांजरा साखर परिवारातील संस्थांचे कार्यकारी संचालक,संचालक मंडळ जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक संचालक मंडळ मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!