महाराष्ट्रातील “धनगड” जमातीचे बोगस दाखले रद्द, धनगर समाजाचे एसटी आरक्षण अंमलबजावणीतील मोठा अडथळा दूर – मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे 

2 Min Read

 

संग्रहित
छायाचित्र – संग्रहित

लातूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबाने ६ धनगड जातीचे दाखले काढले होते. हे बोगस दाखले आज रद्द झाल्याने धनगर समाजाचे एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठीचा मोठा अडथळा दूर झाल्याची प्रतिक्रिया मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की, लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियांना ‘धनगड’ म्हणून दिलेले बोगस जात प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी जुलै २०२४ मध्ये १६ दिवस आमरण उपोषण केले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर व शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे बैठक घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून १५ दिवसांत बोगस प्रमाणपत्र रद्द करू असा शब्द दिला होता. परंतु दीड महिना उलटून ही सरकारच्या प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी कांही हालचाली दिसत नसल्याने दि. ९ सप्टेंबर पासून मल्हारयोद्धा हजारे आणि गोयकर यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे यांना सरकार मागण्यासंदर्भात पाऊले उचलत असून उपोषणापासून परावृत होण्याची विनंती केली होती परंतु उपोषणकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी २० दिवसापर्यंत आमरण उपोषण केले होते. उपोषणाच्या शेवटच्या दिवशी पाणी ही सोडले होते. त्यांनतर उपोषणाच्या २० व्या दिवशी संध्याकाळी आमरण उपोषण स्थगित करून छत्रपती संभाजीनगर येथील जातपडताळणी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांच्या या लढ्याला अखेर यश आले असून जिल्हा जातपडताळणी कार्यालयाने या ६ बोगस प्रमाणपत्राला रद्द केल्याचा आदेश काढले आहे. 

 

मुंबईकडे कूच – मल्हारयोद्धा अनिल गोयकर 

 

एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आम्ही मुंबईकडे रवाना होत असून धनगर समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नसल्याची प्रतिक्रिया मल्हारयोद्धा अनिल गोयकर यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!