लातुरातील वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सवास राज्य शासनाचा पुरस्कार ; बुधवारी पारितोषिक वितरण

1 Min Read

लातूर : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु ल देशपांडे कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चा निकाल घोषित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार भारत माता गणेश मंडळ, देवनांदरा,जि. परभणी, द्वितीय पुरस्कार जय भवानी मित्र मंडळ, ठाणे व तृतीय पुरस्कार वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव, लातूर यांना जाहीर झाला आहे. राज्यातील पहिला क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख, द्वितीय क्रमांकास दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक, सन्मानाचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित 33 जिल्ह्यांसाठीही जिल्हा निहाय पारितोषिक विजेते जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय पारितोषिकाचे स्वरूप रुपये 25000 प्रत्येकी, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. 

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवार, ता. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. यशवंत नाट्यमंदिर, माहीम, मुंबई -१६ येथे दुपारी बारा वाजता हा पारितोषिक वितरण समारंभ आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!