साईनाथ घोणे
निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघांतील असलेल्या निलंगा व देवणी याठिकाणी भव्य व सुसज्ज बसस्थानक असावे अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीला आता मुर्तरूप आलेले असून या दोन्ही ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी नुतन बसस्थानकाचे उभारणी करण्यात आली आहे. त्याच बसस्थानकांचे आज लोकापर्ण माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत. विकासकामे झालेली आहेत. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी त्यात कोठेही खंड पडू नये व विकास कामे दर्जेदार व्हावीत यासाठी आ.निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील असतात.