साईनाथ घोणे
औसा : तालुक्यातील आशीव-मातोळा-किल्लारी-जेवरी-निलंगा रस्ता राज्य मार्ग सुधारणा करणे व लातूर-कव्हा-जमालपूर-लामजनापाटी प्रजिमा रस्त्याची सुधारणा प्रकल्पाचे आज शुक्रवार (दि.११) रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन होणार आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी सा.बां. विभाग मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण असणार आहेत. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत टप्पा-३ व केंद्र शासन सहाय्य (Soft Loan) मधील कामांचा ऑनलाईन पध्दतीने भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे.
कार्यक्रमाला खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खा.डॉ.शिवाजी काळगे, आ.विक्रम काळे,आ.सतीश चव्हाण, आ.रमेश कराड, आ.अमित विलासराव देशमुख, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.बाबासाहेब पाटील, आ.अभिमन्यु पवार, आ.धिरज विलासराव देशमुख, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे (भा.प्र.से.) या मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, दिनांक ११/१०/२०२४ रोजी सकाळी ११:०० वा. ऑनलाईन पध्दतीने आशिव, ता. औसा जि. लातूर येथे भुमिपूजन समारंभ संपन्न होत आहे. या भुमिपूजन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन सा.बां. विभाग, लातूर चे कार्यकारी अभियंता दे.भू. निळकंठ, अधीक्षक अभियंता डॉ.सलीम गु. शेख, मुख्य अभियंता ब. शि.पांढरे, मुख्य अभियंता, तथा प्रकल्प संचालक श.ना.राजभोज यांच्या वतीने करण्यात आले आहे.